Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

वांगणीतील लक्ष्मण तेलंगे यांचे अकस्मात निधन

वांगणीतील लक्ष्मण तेलंगे यांचे अकस्मात निधन

नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील वांगणी येथील रहिवासी लक्ष्मण येसुराम तेलंगे (वय ८०) यांचे गुरुवार दिनांक २५ जून रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात अकस्मात निधन झाले. 
दिवंगत लक्ष्मण तेलंगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वांगणीतील प्रमुख कार्यकर्ते हरिश्चंद्र तेलंगे, मोरेश्वर तेलंगे यांचे वडील होत. दिवंगत लक्ष्मण तेलंगे यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे हरिश्चंद्र, मोरेश्वर, कमलाकर, एक विवाहित मुलगी शैला साळवी, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत लक्ष्मण तेलंगे हे वांगणी गावातील सर्व सामाजिक, धार्मिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत. त्यामुळे त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
दिवंगत लक्ष्मण तेलंगे यांच्या पार्थिवावर वांगणी येथील वैंकुठ स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागोठणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तेलंगे परिवारातील सगेसोयरे, आप्तेष्ट, यांच्यासह विभागातील नागरिक व वांगणीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत लक्ष्मण तेलंगे यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक ४ जुलै रोजी वांगणी येथील तलावावर तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी वांगणी येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे तेलंगे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!