Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलाटॉप न्यूज़बॉलीवुडमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

मानसी वाळंज-मोकल ठरली मिसेस महाराष्ट्र

महाराष्ट्राचा मानाचा मुकुट मानसी वाळंज-मोकलच्या यांच्या नावावर 

नागोठण्याची मानसी वाळंज-मोकल ठरली “मिसेस महाराष्ट्र २०२६” ची मानकरी 

महाराष्ट्राचा मानाचा मुकुट मानसी वाळंज-मोकलच्या यांच्या नावावर 
नागोठणे : महेश पवार 
स्मृती एंटरप्रायझेस प्रस्तुत “The Jewel One Pageant – Mrs Maharashtra 2026” या भव्य सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पुणे येथे दिमाखात पार पडला. अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या या अंतिम फेरीत मानसी वाळंज-मोकल यांनी आपल्या आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, सौंदर्य आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावत “Mrs Maharashtra 2026” हा किताब जिंकला. यापूर्वी अनेक सौंदर्यवती स्पर्धा जिंकलेल्या मानसी वाळंज–मोकल यांनी आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्तेच्या जोरावर मिसेस महाराष्ट्र स्पर्धेतील सौंदर्यवतीचा मनाचा मुकुट मिळविल्याने मानसी वाळंज यांच्या रूपाने नागोठण्याच्या नावलौकिकात पुन्हा एकदा भर पडली आहे. 
या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तब्बल ६ प्रमुख शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्यात आले होते.
या स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, ज्यामधून कठोर निवड प्रक्रियेनंतर ५०  उत्कृष्ट स्पर्धकांची ग्रँड फिनालेसाठी निवड करण्यात आली. हा प्रतिष्ठेचा सोहळा स्मृती एंटरप्राइजेस यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तसेच या स्पर्धेला दैनिक लोकमत यांचे प्रायोजकत्व लाभले होते.
स्वप्नांना पंख देत, महाराष्ट्राचा मान अभिमानाने उंचावणारी मिसेस महाराष्ट्र म्हणून नवी विजेती मानसी वाळंज-मोकल यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांनी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असल्याचे बोलले जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!