E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलटॉप न्यूज़धार्मिकनियुक्तीमनोरंजनमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़
दहीहंडीची जय्यत तयारी
किशोर जैन मित्र मंडळाची सलग १६ वर्षे परंपरा

नागोठण्यात किशोर जैन मित्र मंडळाच्या दहीहंडीची जय्यत तयारी
किशोर जैन मित्र मंडळाची सलग १६ वर्षे परंपरा
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किशोर जैन मित्र मंडळाकडून दरवर्षी भव्य स्वरूपात दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. किशोर जैन मित्र मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या दहीहंडीचे हे १६ वे वर्ष असून या दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती किशोर जैन मित्र मंडळ दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला दहीहंडी उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष अर्चित भिसे, सचिव मंदार मोरे, खजिनदार घनश्याम ताडकर, कार्यवाहक धनंजय जगताप, जितेंद्र जाधव, ॲड. प्रकाश कांबळे, सुरेश गिजे, मनोज टके, सदस्य केतन भोय, रोशन गुरव, ऋषिकेश कारखानीस, भावेश खंडागळे, महेंद्र नागोठणेकर, सिद्धार्थ गिजे, मनीष पवार, राजेश पिंपळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

किशोर जैन मित्र मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सलग १६ व्या वर्षी बांधण्यात येणाऱ्या या दहीहंडीचे पूजन सकाळी ११ वाजता किशोरभाई जैन, भाई टके, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व किशोर जैन मित्र मंडळाचे पदाधिकारी, दहीहंडी उत्सव सोहळ्याचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर या दहीहंडी सोहळ्याची उत्साहात सुरुवात होणार आहे.

दहीहंडी सोहळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यासपीठावर किशोर जैन मित्र मंडळाच्या कमिटी कडून आलेले पाहुणे, मान्यवर, पत्रकार, दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्यवाहक यांचे स्वागत करण्यात येणार आहे. किशोर जैन मित्र मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यात दुपारी दोन वाजता ते रात्री आठ वाजेपर्यंत पर्यंत सलामीची वेळ असणार आहे. सलामी ही ५ थरांची द्यायची असून, पाच थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला रुपये, २ हजार, ५२५ रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी दोन ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांना सन्मान चिन्ह व बक्षीस देण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता दहीहंडी फोडण्याची शेवटची वेळ ठरविण्यात आली असून दहीहंडी फोडण्याचा मान मिळ मिळविणाऱ्या गोविंदा पथकाला रुपये ५५ हजार, ५५५ चे रोख बक्षीस तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या दहीहंडी सोहळ्यात नागोठणे शहर व विभागातील जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन किशोर जैन मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.




