E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलामहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

एक गाव एक गोविंदा संकल्पना कौतुकास्पद

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण

नागोठण्यातील “एक गाव एक गोविंदा” संकल्पना कौतुकास्पद : आ. अनिकेतभाई तटकरे

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण 

नागोठणे | महेश पवार

आपल्याकडे वर्षाचे ३६४ दिवस आपण पाहतो की, सर्वजण एकमेकांचे पाय ओढण्यात सर्वत्र मग्न असतात. मात्र गोकुळाष्टमी हा असा एकमेव सण आहे की, आपण एकमेकांचा आधार घेत थरावर थर रचून दहीहंडी फोडत असतो. अनेक ठिकाणी गणेशोत्सव काळात एक गाव, एक गणपती संकल्पना पाहायला मिळते. रोहा शहरातही गेली सुमारे १२५ वर्षे “एक गाव एक गणपती” गणेशोत्सव सुरू आहे. गोकुळाष्टमीतही अनेक ठिकाणी वेगवेगळे गोविंदा निघत असतात. असे असतानाच संपूर्ण नागोठण्यात “एक गाव, एक गोविंदा” ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून या गोविंदा पथकाला चांगले यश मिळू दे अशी आई जोगेश्वरी माते चरणी प्रार्थना करतो अशा शुभेच्छा आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्टच्या अनावरण प्रसंगी दिल्या.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात गुरुवारी (दि.३) रात्री १० वाजता संपन्न झालेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरणाच्या कार्यक्रमाला आई जोगेश्वरी गोविंद पथकाचे पुरस्कर्ते, राष्ट्रवादीचे नेते किशोरशेठ जैन, नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहराध्यक्ष बाळासाहेब टके,
संजय भोसले, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्य अकलाख पानसरे, प्रकाश कांबळे, सचिन ठोंबरे, पूनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक, हिराजी शिंदे, शैलेश रावकर, अतुल काळे, आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे अध्यक्ष भरत गिजे, प्रशिक्षक राजेश सुर्वे, रवी जासूद, किशोर जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव, कार्यवाहक सुरेश गिजे, मनोज टके, जितेंद्र जाधव, धनंजय जगताप, खजिनदार घनश्याम ताडकर, आदींसह सर्व पदाधिकारी व मित्र मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ व तरुण वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नागोठण्याचे नाव रोहातही जायला हवे –किशोरशेठ जैन :-
एक गाव एक गोविंदा टॅग लाईन खाली स्थापन झालेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाची सुरुवात गेल्या वर्षी याच ठिकाणी झाली होती आणि याच ठिकाणी गोविंदा पथकाच्या टी-शर्ट चे अनावरण झाले होते. गेल्या वर्षी आई जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने चांगली सुरुवात झाली. आपण पाली मधील दहीहंड्या फोडण्याचा मान मिळविला. यावर्षी रोहा येथील मानाची दहीहंडी बांधणारे आमदार अनिकभाई तटकरे आज आपल्या येथे आले आहेत. त्यामुळे यावर्षी नागोठणेचे नाव रोह्यातही जायला हवे अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरशेठ जैन यांनी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला दिल्या.

(चौथ्या थरावर हंडी फोडताना कु. शार्विल कार्तिक जैन)

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरणाच्या कार्यक्रमानंतर आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यासमोर गोविंदा पथकाने यावर्षीच्या आपल्या शेवटच्या सरावाला सुरुवात केली. यावेळी किशोरशेठ जैन यांचा नातू कुमार शार्विल कार्तिक जैन त्याने गोविंदाच्या खांद्यावर बसून चौथ्या थरावरून दहीहंडी फोडली. अवघ्या चार वर्षाच्या शर्विलच्या हिम्मतीचे सर्वांनी कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सुर्वे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!