E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

खासदर सुनील तटकरे साहेब व कार्यकर्त्यांमधील मी दुवा  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांची नागोठण्यात भेट

खासदार सुनील तटकरे साहेब व कार्यकर्त्यांमधील मी दुवा : महेंद्र पोटफोडे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांची नागोठण्यात भेट
नागोठणे | महेश पवार
रोहा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ज्येष्ठ नेते यांच्या सहकार्याने आणि आपले नेते खासदार सुनील तटकरे त्यांच्या आशीर्वादाने गेल्या १६–१७ वर्षानंतर मला पक्षाची एक मोठी जबाबदारी मिळाली असून या संधीचे मी नक्कीच सोने करेन.  मागील निवडणुकीत काय झाले याचा विचार न करता, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रथम आपला बूथ, आपला वार्ड, आपली ग्रामपंचायत सांभाळायची आहे. खासदार सुनील तटकरे साहेब, मंत्री अदितीताई आमदार अनिकेतभाई यांची ताकद आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळे भविष्यात मी खासदर सुनील तटकरे साहेब व कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करून नागोठणे विभागासह, संपूर्ण रोहा तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांनी नागोठण्यात केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते संपूर्ण तालुक्याचा दौरा करून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटी येत आहेत.  याचाच एक भाग म्हणून नागोठणे शहर व विभागातील कार्यकर्त्यांची एक बैठक राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी गुरुवारी (१०) सकाळी घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, विलास चौलकर, लियाकतशेठ कडवेकर, संजय भोसले, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, चंद्रकांत गायकवाड, हरीश टके, मनोहर सुटे, हिराजी शिंदे, जुगनशेठ जैन, मंगेश तेरडे, विनायक चितळकर, मनोज शिर्के राजेंद्र शिंदे, प्रमोद जांबेकर, निवास पवार, महेंद्र हंबीर, मनोज टके, प्रथमेश काळे, चेतन टके, ॲड. श्रीकांत रावकर, ॲड. रमेश जाधव, दिलीप आवाद, बिपीन सोष्टे, रुचिर मोरे, प्रकाश कांबळे, धनंजय जगताप, भारत भोय, दिगंबर खराडे, रविंद्र टके, महेंद्र पवार, सुधाकर निंबाळकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांचा नागोठणे विभागाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी आपल्या मनोगतात महेंद्र पोटफोडे यांच्या निवडीचे स्वागत करून जेव्हा एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याची महत्त्वाच्या पदावर निवड होते तेव्हा पक्ष संघटना बांधणी मजबूत होते असे मत व्यक्त केले. शिवरामभाऊ शिंदे म्हणाले की, तालुक्यात काहीतरी नवीन घडवून आणण्यासाठी अध्यक्षांनी हा दौरा केला असून प्रत्येक वेळी आपण साहेबांकडे जाऊ शकत नाही म्हणून साहेबांनी आपल्याला एक चांगला अध्यक्ष दिला आहे.
सदानंद  गायकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामपंचायत ही सर्वसामान्य नागरिकांचा कणा असते. सध्या सर्वत्र प्रशासकीय कारभार सुरू असल्याने विकास थांबला आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्यातील मरगळ दूर करून कामाला लागा. तसेच खासदार तटकरे साहेबांनी या विभागाला खूप दिले असले तरी नव्याने आलेल्या कंपनीमुळे ग्रामपंचायतींवर ताण येत असल्याने नवनिर्वाचित अध्यक्षांनी या भागातील विकास कामांची गती वाढवावी असे सुचित केले.  विलास चौलकर यांनी सांगितले की, नागोठणे विभागात आपण ९० टक्के असतानाही आपला पराभव झाला, यासाठी आता आपण या विभागाकडे लक्ष देऊन पुन्हा मजबूत बांधणी करावी. नागोठणे विभागासाठी नवीन अध्यक्षांनी खासदार तटकरे साहेबांकडे अधिकाधिक कामे सुचवावीत असे मत विभागीय अध्यक्ष संतोष कोळी यांनी व्यक्त केले. महेंद्र पोटफोडे हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते असल्याने तटकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया असे यावेळी संजय भोसले यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!