E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़धार्मिकमहाराष्ट्रयूपीराजस्थानराज्यलोकल न्यूज़

चंद्रप्रभू स्वामीजींचा पालखी सोहळा

पालखीचे नागोठणे शहरात सर्वत्र स्वागत 

नागोठण्यात पर्युषण पर्वारंभानिमित्त भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींचा भव्य पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न 

पालखीचे नागोठणे शहरात सर्वत्र स्वागत 
नागोठणे | महेश पवार
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण महापर्वाच्या प्रारंभानिमित्त नागोठणे येथे जैन तीर्थंकर भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींच्या भव्य पालखीचे आयोजन बुधवारी (दि.१६) करण्यात आले होते. नागोठण्यातील जैन बांधवांकडून हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिभावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. 
नागोठणे येथील जैन मंदिरातून भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींच्या पालखीचे सकाळी नागोठणे शहरात  प्रस्थान झाले. संपूर्ण नागोठणे गावातून प्रदक्षिणा घालत ही पालखी पुन्हा जैन मंदिरात आल्यानंतर या धार्मिक सोहळ्याचा समारोप झाला.  यावेळी जैन बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
या पालखी सोहळ्यात राजिपचे माजी सदस्य किशोरभाई जैन, राजिपचे माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, नागोठणे ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण जैन, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, माजी उपसरपंच जुगन प्रतापमल जैन, माजी उपसरपंच अकलाख पानसरे, जैन मंदिराचे विश्वस्त सोहनशेठ जैन, बाजारपेठ–नागोठणे नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष कावेडिया, बाजारपेठ–नागोठणे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश उर्फ बंटीशेठ जैन आदींसह असंख्य जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
पालखी दरम्यान संपूर्ण परिसरात भक्ती, अहिंसा, संयम आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. पर्युषण पर्व हे आत्म शुद्धी, आत्मचिंतन, क्षमा, संयम आणि अहिंसेचा संदेश देणारे पवित्र पर्व मानले जाते. या पावन पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्भावना नांदो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!