E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़नियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
तसव्वूर अधिकारी यांची नियुक्ती
नागोठणे शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यावर भर देणार

नागोठणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तसव्वूर उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांची नियुक्ती
नागोठणे शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यावर भर देणार
नागोठणे | महेश पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नागोठणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नागोठणे मोहल्ल्यातील तरुण तडफदार युवा कार्यकर्ते तसव्वूर अब्दुल वहाब उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मितेश ह. कल्याणी यांनी याबाबतचे जारी केलेले अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच काँग्रेस पक्षाच्या रोहा येथील एका बैठकीत तसव्वूर अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली, तसेच जिल्हा उपाध्यक्ष अशफाकभाई पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख आणि जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाशजी कुशवाहा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहा येथील हॉटेल मिराज येथे झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशफाकभाई पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख, जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार, सुनील देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाशजी कुशवाहा, अॅड. सुनील सानप, रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य बिलाल कुरेशी, आसिफ मुल्ला यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष पदाच्या असणार महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या :–
तसव्वूर अधिकारी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तत्वे, धोरणे आणि संघटनात्मक उद्दिष्टे यांप्रती असलेली बांधिलकी तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्य करण्याची त्यांची तत्परता लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नवनियुक्त अध्यक्ष म्हणून तसव्वूर अधिकारी यांना नागोठणे शहरात पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करणे, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, संघटनात्मक उपक्रम राबविणे, जनतेच्या विविध प्रश्नांना योग्य त्या शासकीय व प्रशासकीय प्राधिकरणांसमोर मांडणे, तसेच नागोठणे शहरातील नागरिकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी कार्य करणे, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणा, शिस्त, समर्पण आणि निष्ठेने, तसेच पक्षाच्या संविधान आणि नियमांचे पालन करून पार पाडाल, असा विश्वास तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी यांनी नियुक्तपत्रात व्यक्त केला असून त्यांनी तसव्वूर अधिकारी यांना पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे नागोठणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




