Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifबॉलीवुडमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

साहित्यिक रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन केला सन्मान 

'दैनिक महासागर' वृत्तपत्राने केला गौरव

साहित्यिक रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन केला सन्मान 

सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ वृत्तपत्राने केला गौरव

नागोठणे | महेश पवार 

सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ वृत्तपत्राचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच रोहा येथील चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी व्यासपीठावर टीव्ही ॲक्टर आणि मराठी बिग बॉस फेम जानवी किल्लेकर, दैनिक महासागरचे मालक व मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कुमारी वनश्री शेडगे, विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग तालुका अध्यक्ष साहित्यिक रमेश धनावडे, सिटी बेल चॅनल मालक व पनवेल पत्रकार विकास मंचचे मंदार दोंदे, दैनिक महासागरचे रायगड जिल्हा प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे पीआरओ कुमार थत्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रमेश धनावडे यांची मनतरंग, उर्मी, जीवनगाणे, कवितेच्या सुरातून, नादखुळा,  असेच काहीतरी, अशी सहा पुस्तके प्रकाशित आहेत.

त्यांचा’जीवनगाणे’ स्तंभ दैनिक कृषीवल मध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता. ‘गुदगुल्या’ या राजकीय व सामाजिक वात्रटिका “दैनिक पुढारी” मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. “दैनिक रायगड टाईम्स” साठी त्यांच्या ‘बी पॉझिटिव्ह’ या डिजिटल मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा ‘कवितेच्या सुरातून’ हा महाराष्ट्रातील प्रख्यात कवींवरील स्तंभ “दैनिक पुढारी” मध्ये सलग दीड वर्ष प्रसिद्ध झाला आहे.

त्यांनी “विशेष कार्यकारी अधिकारी” महाराष्ट्र शासन म्हणूनही काम केले आहे. त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचन करून रसिकांची मने जिंकली आहेत. तसेच ते अलिबाग लायन्स क्लबचे माजी प्रेसिडेंट आहेत. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या मराठी चित्रपटासाठी त्यांचे गीत आर्या आंबेकर यांनी गायले आहे. ते अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून आमंत्रित असतात.

रमेश धनावडे यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कवितेच्या सुरातून या पुस्तकासाठी प्रथम पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र.वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार, दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार, म. ना. पाटील साहित्य पुरस्कार, असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

नुकत्याच मिळालेल्या साहित्यातील “रायगड रत्न” पुरस्काराने रमेश धनावडे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. त्यांना मिळालेल्या या साहित्य पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!