
नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात २० रुग्णांची डोळे तपासणी
मोतीबिंदू आढळलेल्या ८ रुग्णांची होणार शस्त्रक्रिया
नागोठणे | महेश पवार
नागोठणे लायन्स क्लबचे सदस्य जयराम पवार सर यांनी आपल्या दिवंगत मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई मारुती पवार यांच्या स्मरणार्थ आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल, नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात बुधवारी(दि.६) आयोजित केलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात २० नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. यामध्ये मोतिबिंदू आढळले ल्या ८ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले.

नागोठणे लायन्स क्लबचे उपाध्यक्ष लायन विशाल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिरात नागोठणे लायन्स क्लबचे शिक्षण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन, एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे, झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, एम जे एफ लायन सुधाकर जवके, सेक्रेटरी लायन डॉ.अनिल गिते, लायन व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, लायन विजय शहासने, लायन सुनील कुथे, लायन दीपक गायकवाड, लायन सुजाता जवके, लायन विद्या म्हात्रे, नारायण चौलकर, अमित पवार, मिलिंद टेमकर, लता टेमकर, बाळू रटाटे, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलचे डॉ. यश सावंत, सहाय्यक सायली उतेकर, प्रतिक्षा माने आदींसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक नेत्र तपासणीसाठी यावेळी उपस्थित होते. लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे मोहन म्हात्रे व फिजिओथेरपिस्ट डॉ. कु. काव्या टेमकर यांचा या शिबिराच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी लायन डॉ.अनिल गीते यांनी मोतीबिंदू शास्त्रक्रिये नंतरची डोळ्यांची निगा व काळजी याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.




