E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगडचे यश 

१९ सुवर्ण, १२ रौप्य व ८ कांस्य पदक मिळवून रायगड जिल्हा तिसऱ्या स्थानी 

१६ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगड संघाचे घवघवीत यश 

१९ सुवर्ण, १२ रौप्य व ८ कांस्य पदक मिळवून रायगड जिल्हा तिसऱ्या स्थानी 
नागोठणे | महेश पवार
१६ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट या स्पर्धेचे आयोजन  इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियन ने सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल,  तपोवन- नाशिक येथे ११ ते १३ जून असे तीन दिवस करण्यात आले होते.  सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ४३० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ १३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला होता.या सोहळयास अमोल बाळासाहेब पाटील- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर,इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सुरेखा येवले- नवी मुंबई पिंच्याक सिल्याट असोसिएशन च्या अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. ३५ सुवर्ण, १०  रौप्य पदक,  ३ कांस्य पदक मिळवून ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवून आपले स्थान अबाधित ठेवले. २३ सुवर्ण, ८ रौप्य पदक व ६ कांस्य पदक मिळवून सांगली जिल्हाने दुसऱ्या क्रमांचे स्थान मिळवले. तर या स्पर्धेत ३० खेळाडूंचा सहभाग असलेल्या रायगड जिल्ह्याने १९ सुवर्ण, १२ रौप्य व ८ कांस्य पदक मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले तसेच १४ सुवर्ण, ८ रौप्य आणि १५ कांस्य पदके मिळवून यजमान नाशिक जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकावला.
सुवर्ण पदक विजेत्या रायगड संघाच्या खेळाडूंमध्ये
नेहा दोरे ३ सुवर्णपदक, रियांश सारले, शिवशांत सारगे, अनिश पालकर, श्रेयश शेडगे प्रत्येकी २ सुवर्ण पदक तर जय गोळे, श्रीशा रेवले, शौर्य वाघमारे, श्रीयश शेडगे, प्रांजळ खारपुडे, प्रीत माळी, एक सुवर्ण पदक मिळालेल्या खेळाडूंमध्ये राकेश पवार, रोहित गायकवाड, अनुज सरनाईक,  मयंक नाकटे रौप्य पदक विजेत्या खेळाडूंमध्ये हर्ष पाटील २ पदक, १ रौप्य पदक विजेत्या खेळाडूंमध्ये सर्वांश सारले, शौर्य धसाडे, जय कुलकर्णी, प्रांजळ खारपुडे,  अनिश पालकर, पीयूष साळुंखे, ओमकार साळुंखे,  श्रेयश शेडगे, प्रशांत सारगे, रोहित गायकवाड, कांस्य पदक विजेत्यांमध्ये हनी मोदी, श्रीयश शेडगे, शौर्य धसाडे,  अभिरुद्रप्रताप राय, आदर्श पटेल, अंश म्हात्रे, अर्णव वादळ, प्रशांत सारगे, जय गोळे यांचा समावेश आहे.
सर्व खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!