E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातआंदोलनकायदा व सुव्यवस्थाटेक्नोलॉजीटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजकारणलोकल न्यूज़वाहतूक
नागोठण्यातील पुलाची पाहणी
पुलाची रील बनविणाऱ्या यशराज शेळकेचे केले अभिनंदन

“डोहाळे जेवण” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्याकडून नागोठण्यातील पुलाची पाहणी
पुलाची रील बनविणाऱ्या यशराज शेळकेचे केले अभिनंदन !
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील पुलाला तडे गेल्याच्या व पुलाचे पोट फुगल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पुलाचे डोहाळे जेवण’ या उपरोधिक कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उड्डाण पुलाजवळ केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागोठण्यातील त्या पुलाच्या ठिकाणी येऊन चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या डागडुजी बद्दल नाराजी व्यक्त करून प्रशासनावर ताशेरे ओढले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नागोठण्यातील या पुलाच्या डागडुजी संदर्भात जनजागृतीपर रील बनविणारा यशराज शेळके याला पुलाच्या ठिकाणी बोलून त्याचे अभिनंदन केले.

नागोठण्यातील हा धोकादायक महाकाय पूल सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. या धोकादायक महाकाय पुलावरून गणेशोत्सव काळात कार सारखी हलकी वाहने सोडता यावीत यासाठी महामार्गावर थातूरमातूर डागडुजी करण्याचे काम महामार्ग प्राधिकरण व महामार्गाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कडून सुरू आहे. या डागडुजीच्या कामातील हास्यास्पद बाब म्हणजे या पुलावर भेगा पडलेल्या ठिकाणी साधारण एक फुटाची खाच मारून, या खाचेच्या दोन्ही टोकांना दोन छिद्र मारून त्यामध्ये पोलादी सळी टाकण्यात येत आहे. या सळीमुळे पुलाची भेग मोठी होणार नाही अशी शक्यता गृहीत धरून ठेकेदाराकडून ही धडपड सुरू आहे.

याशिवाय पुलाच्या बाहेरील बाजूस दोन पॅनलच्या भेगांमध्ये काचेची पट्टी लावून त्याच्या दोन्ही टोकांना एम सील लावण्यात येत आहे. एमसीएल द्वारे दोन पॅनलच्या भेगांमध्ये लावलेले ही काचेची पट्टी या पॅनलला किती मोठा आधार देणार असा हास्यस्पद प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नवीन नवीन हास्यास्पद युक्त्या काढणारे महामार्ग प्राधिकरणाचे व कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांची बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे असेही बोलले जात आहे.





