E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रलोकल न्यूज़
नागोठण्यातील जुने रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात

नागोठण्यातील जुने रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात
नागोठणे | महेश पवार : येथील प्रभू आळी परिसरात असलेल्या पुरातन पेशवे कालीन श्री जुने रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या जुने रामेश्वर मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचे अधिकार येथील कायस्थ प्रभू समाजाच्या विश्वस्त समितीकडे असल्याने दरवर्षी प्रमाणे

यावर्षीही कायस्थ प्रभू समाज विश्वस्त समितीच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शिव भक्तांसाठी शिस्तबद्ध नियोजन व व्यवस्था केली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच जुने रामेश्वर मंदिरात शिवभक्त नागरिक, महिलांसह अबाल-वृध्दांची गर्दी झाली होती. मंदिरातील शिवलिंगावर मोठ्या संख्येतील शिवभक्तांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या विश्वस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील सर्व तरुण वर्ग व महिला मंडळाने हा महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मेहनत घेतली.





