Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकनिधनमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे यांना पितृशोक

तुकाराम ठोंबरे यांचे निधन

ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे यांना पितृशोक

नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील खडक अळी येथील रहिवासी तुकाराम नारायण ठोंबरे (वय ७५) यांचे सोमवार दि. १ जानेवारी रोजी रात्री अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. नागोठणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सचिन ठोंबरे यांचे ते वडील होत. शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या तुकाराम ठोंबरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता ठोंबरे, मुलगा सचिन, दोन विवाहित मुली संगीता जासूद व कल्पना नितीन राऊत, सून, जावई, नातवंडे यांच्यासह मोठ्या परिवार आहे. 
दिवंगत तुकाराम ठोंबरे यांच्या पार्थिवावर अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत मंगळवार दि. २ जून रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ठोंबरे परिवारातील सगेसोयरे, आप्तेष्ट, यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत तुकाराम ठोंबरे यांचे दशक्रिया विधी बुधवार  दिनांक १० जून रोजी उद्धर (ता.सुधागड) तर उत्तरकार्य शुक्रवार दिनांक १२ जून रोजी खडकआळी – नागोठणे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे ठोंबरे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!