E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
सपोनि रविंद्र पारखे यांनी पदभार स्वीकारला

नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सपोनि रविंद्र पारखे यांनी पदभार स्वीकारला
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि महत्वाचे पोलीस ठाणे असलेल्या नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी बुधवारी (दि.२४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला. यावेळी नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे पोलिस ठाण्याचे याआधीचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांची अलिबाग येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली झाल्याने याआधी म्हसळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सपोनि रविंद्र पारखे यांनी नागोठणे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने नागोठण्यातील प्रमुख पत्रकार संघटना असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सपोनि रविंद्र पारखे यांची भेट घेऊन त्यांना येथील चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर नागोठणे शहरातील अनेक मान्यवरांनी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांचे स्वागत करून त्यांना नागोठणे पोलीस ठाण्यातील त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या कारकिर्दीत नागोठणे शहर व परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यात नक्कीच चांगल्याप्रकारे मदत होईल अशी माफक अपेक्षा नागोठण्यातील नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.




