E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधर्मधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

नागोठण्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील खडकआळी भागातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या स्वरूपात व उत्साहात साजरी करण्यात आली.  येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि.२९) सकाळपासूनच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  या केंद्रातील गुरुपौर्णिमेची सुरुवात सकाळी पाच वाजता पूजा विधीने करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आले. सकाळी ८.३० व १०.३० वाजता तसेच सायंकाळी ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घेण्यात आली. सकाळच्या ८.३० वाजताच्या आरतीचा मान खडक आळीतील स्वामी सेविका चित्रा अनिकेत खंडागळे यांना तर सकाळी साडेदहा वाजताच्या आरतीचा मान बेणसे येथील विनोद गोरे यांना सपत्नीक मिळाला. 
या तीनही आरतीला महिला व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक केंद्रात सकाळपासून रात्री पर्यंत दर्शन व सप्तशृंगी पाठाचे वाचन भक्तगणांकडून करण्यात आले. मठात दर्शनासाठी आलेल्या सर्व स्वामी भक्त व  नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.  खडक आळीतील अध्यात्मिक विकास केंद्रातील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होण्यासाठी खडकआळी ग्रामस्थ व सर्व स्वामी सेवेक-यांनी मेहनत घेतली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!