E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

वार्षिक सभेचे रविवारी आयोजन

जास्तीत जास्त सभासदांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सभेचे रविवारी आयोजन

जास्तीत जास्त सभासदांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन 

नागोठणे | महेश पवार

नागोठण्यातील प्रथितयश अशा श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सभेचे आयोजन रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता नागोठण्यातील जैन मंदिरासमोरील आराधना भवन येथे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे सचिव संजय काकडे यांनी दिली. याशिवाय पतसंस्थेच्या कार्यालयात रविवारीच दुपारी चार ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजे निमित्त सर्व सभासद व मित्रपरिवाराने तीर्थ पसादाचा लाभ घेण्याचे आवाहनही संजय काकडे यांनी केले आहे.

या वार्षिक सभेत इतिवृत्त वाचून कायम करणे, वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, कायदा व नियम यास अनुसरून नफा विभागणीस मान्यता देणे, लाभांश जाहीर करणे, गेल्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय खर्चाची माहिती देणे व येत्या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकास मान्यता देणे यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सभासदांची गुणवंत मुले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आदींचाही या वार्षिक सभेच्या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे.  श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले यांनी कले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!