E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

महामार्गावर सुकेळी गावानजिक महामार्गावर पाणीच पाणी

पाण्यामध्ये अडकली कार : स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने धक्का मारुन बाहेर काढली कार

महामार्गावर सुकेळी गावानजिक महामार्गावर पाणीच पाणी : वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाण्यामध्ये अडकली कार : स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने धक्का मारुन बाहेर काढली कार

सुकेळी ( दिनेश ठमके) : पावसाने अक्षरशः: दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला असुन सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन सर्वच ठिकाणी विस्कळीत परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गावर देखिल अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले असतांनाच सुकेळी गावाजवळ महामार्गावर महामार्गावरील मोरवीच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान महामार्गावर येवढं पाणीच पाणी झाले असतानाच एका कार चालकाने त्या पाण्यातुन गाडी टाकण्याच्या हलगर्जीपणामुळे गाडी पाण्यातच अडकुन राहीली. शेवटी सुकेळी येथिल ऐनघर ग्रामपंचायतींचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मनोहरभाई सुटे व येथिल स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ती कार बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले. पंरतु पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे वाहतुक सुरु होण्यासाठी काही तासांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. यासाठी वाहतूक पोलीसांनी अथक प्रयत्न केले. महामार्गावरील सुकेळी या ठिकाणी येणा-या वारंवार अडचणींवर काही तरी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!